पहिल्यांदा एका मैत्रिणीच्या स्टेटस ला पहिलं, मग थोड्या दिवसांनी अजुन एका मैत्रिणीनी प्रोफाइल फोटो म्हणुन लावला. परत बघते तर काय आणखीन एका स्टेटस ला हा परत हजर ! म्हणलं चाललंय काय आता माझ्या स्वप्नात यायचं बाकी आहे, असं म्हणलं आणि त्या दिवशी स्वप्नात, जास्वंदाचं झाड लालबुंद टपोऱ्या फुलांनी लगडलेलं !! मी स्वप्नातच इतकी खुश झाले. […]